

usha nadkarni
esakal
मराठी इंडस्ट्रीतील खाष्ट सासू म्हणून लोकप्रिय असणाऱ्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक धास्ती निर्माण केली. संपूर्ण इंडस्ट्रीच्या आऊ असणाऱ्या उषा नाडकर्णी या अनेकदा नकारात्मक भूमिकेतच दिसल्या. त्यामुळे त्या खऱ्या आयुष्यातही अशाच वागतात असं अनेकांना वाटतं. मात्र त्या खऱ्या आयुष्यात खूप प्रेमळ आहेत असं अनेक कलाकारांचं म्हणणं आहे. त्यांची सहकलाकारांसोबत चांगलं जमतं. त्या अनेक मुलाखतीत त्यांच्या कामाबद्दल आणि कलाकारांबद्दल बोलताना दिसल्या. मात्र आता एका मुलाखतीत पहिल्यांदाच त्या त्यांच्या नवऱ्याबद्दल बोलल्या आहेत. नवऱ्याच्या फोटोबद्दल विचारणाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावलेत.