
मराठीसोबतच हिंदी मालिका आणि चित्रपटात आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी सध्या त्यांच्या मुलाखतीमुळे चर्चेत आहेत. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केलंय. उषा या 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचल्या. त्यांची 'माहेरची साडी' चित्रपटातील खाष्ट सासूची प्रतिमा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. मात्र वयाची सत्तरी ओलांडली तरी उषा घरी एकट्याच राहतात. उषा जेव्हा बिग बॉस मराठीमध्ये गेलेल्या तेव्हा त्यांचा मुलगा अभिजीत याने एका मुलाखतीत आपल्याला याबद्दल काहीही ठाऊक नसल्याचं सांगितलं होतं.