

utkarsh shinde on babasaheb ambedkar
ESAKAL
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ज्यांना आदराने बाबासाहेब आंबेडकर म्हणून ओळखलं जातं आज ६ डिसेंबर रोजी त्यांची पुण्यतिथी आहे. संघर्ष लहानपणापासूनच बाबासाहेबांच्या पाचवीला पुजलेला मात्र त्यांनी प्रत्येक परिस्थितीला सामोरं जात भारतरत्न होण्याचा मान मिळवला. आज त्यांच्या पुण्यतिथीला चैत्यभूमीवर जनसागर उसळला आहे. या महामानवाला वंदन करण्यासाठी त्यांचे अनुयायी महाराष्ट्रातून मुंबई गाठतात. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या महार समाजात जन्म झाल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच जातिभेद आणि सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. या अडथळ्यांवर मात करून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. ते कधीही खचले नाहीत. मात्र एके दिवशी त्यांच्या मनाचा तोल ढळला आणि ते खूप रडले होते. लोकप्रिय मराठी गायक उत्कर्ष शिंदे यांने त्यांच्याबद्दलचा खास किस्सा सांगितला आहे.