

Uttar Marathi Movie Review
esakal
Marathi Movie Review : आई म्हणजे मायेचा सागर... आई म्हणजे ममता... आई म्हणजे आपल्या मुलांची काळजी घेणारी आणि त्यांना प्रेमाने वाढविणारी व्यक्ती... अशाच एका प्रेमळ आईचा आणि तिच्या आधुनिक विचारसरणीच्या मुलाची हळूवार कहाणी म्हणजे ‘उत्तर’ हा मराठी चित्रपट. आज सगळीकडे एआयचा बोलबाला आहे, त्यामुळे कथेला आधुनिक संदर्भ देण्यासाठी एआयची कल्पना कथानकात गुंफण्यात आली आहे. त्याचाच आधार घेऊन ही कथा मांडलेली आहे.