'ऊत' चित्रपटातून नवी जोडी रुपेरी पडद्यावर; कोण आहेत राज मिसाळ अन् आर्या सावे

Uut Marathi Movie With Fresh Pair Of Actors: अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला.
uut
uutesakal
Updated on

तारुण्याच्या पंखांत आकाशाला गवसणी घालण्याचं बळ असतं. व्यवस्थेविरुद्ध बंड करणारी तरुणाईच असते. व्यवस्थेविरुद्ध केलेल्या संघर्षाची कहाणी सांगणारा वेरा फिल्म्स निर्मित आणि राम मलिक लिखित-दिग्दर्शित 'ऊत' हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात एक संघर्ष कथा पहायला मिळणार असून या सोबतच 'ऊत' मध्ये एक प्रेमकथाही आहे. या प्रेमकथेचा नायक अभिनेता राज मिसाळ असून, अभिनेत्री आर्या सावे ही नायिका आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ही नवी जोडी मराठी रुपेरी पडद्यावर दाखल झाली आहे. या चित्रपटाचा शानदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच अभिनेते प्रसिद्ध मकरंद देशपांडे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मंचावर चित्रपटातील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com