
Marathi Entertainment News : ‘वामा - लढाई सन्मानाची’ या चित्रपटातील टायटल साँग नुकतेच प्रदर्शित झाले असून, रसिकांमध्ये आता या चित्रपटाविषयी विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध गायक कैलास खेर आणि मंजिरा गांगुली यांच्या जोशपूर्ण आवाजात सादर करण्यात आलेले हे गीत मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून रिजू रॉय यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. हे गाणे म्हणजे सन्मानासाठी लढणाऱ्या स्त्रीशक्तीचं प्रतीक आहे.