
वडापावच्या चवीसारखाच तिखट-गोड नात्यांचा अनुभव देणारा कौटुंबिक चित्रपट ‘वडापाव’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे, ज्यामुळे ही कथा एका गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी असल्याचं स्पष्ट होतं. या चित्रपटातून प्रसाद ओक पहिल्यांदाच दिग्दर्शक आणि अभिनेता अशा दुहेरी भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे, हा त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीतील १०० वा चित्रपट आहे.