

vaidehi parshurami
esakal
'...आणि काशिनाथ घाणेकर' चित्रपटातून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी इंडस्ट्रीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. ती उत्तम नृत्यांगना आहे. ती 'कथातित' हा सांगितिक नृत्य कार्यक्रम अतिशय जोरात सुरू आहे. वैदेहीने स्वतः या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. मात्र वैदेहीने तिच्या आयुष्यात एक वेगळा निर्णय घेतलाय. ती आईवडिलांसोबत राहत नाही. महत्वाचं म्हणजे तिचे आईवडील तिच्यापासून अवघ्या १० मिनिटांवर राहतात. तरीही ते एकाच घरात राहत नाहीत. आता मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं आहे.