

vaidehi parshurami
esakal
अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. तिने अनेक चित्रपटातून आपल्या अभिनयाची ताकद दाखवलीये. तिचा 'आणि काशिनाथ घाणेकर' चित्रपटातील अभिनय प्रेक्षकांना आवडला होता. सध्या वैदेहीने स्वतःचं प्रोडक्शन हाउस सुरू केलं आहे. यात तिचा 'कथातित' हा सांगितिक नृत्याचा कार्यक्रम जोरदार सुरु आहे. वैदेहीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. मात्र ३४ वर्षाची वैदेही अजूनही अविवाहीत का आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. आता तिने त्यामागचं कारण सांगितलंय.