गेल्या चार पाच दिवसांपासून एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेची. वैष्णवी हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. तिचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला होता. परंतु वैष्णवीच्या वडिलांनी मोठे खुलासे केले आहेत.