

shubh shravani
ESAKAL
झी मराठी वाहिनीवर गेल्या काही महिन्यात अनेक बदल करण्यात आले. काही मालिका नव्याने सुरू झाल्या. तर काही मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. असं असताना काही दिवसांपूर्वीच झी मराठीने आणखी एका मालिकेची घोषणा केली होती. या मालिकेच्या प्रोमोमधून अभिनेत्री वल्लरी विराज मालिकेत मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार असल्याचं समोर आलं होतं. मात्र मालिकेबद्दल इतर कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. आता अखेर झी मराठीने या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांसोबत शेअर केलाय. या नव्या मालिकेतून दोन अनुभवी कलाकार झी मराठीवर कमबॅक करणार आहेत.