VANCHITA MARATHI SHORT FILM
esakal
DIVAKAR MOHITE DIRECTED TRANSGENDER AWARENESS SHORT FILM: तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील संघर्ष, शिक्षणाच्या संधी आणि समाजाकडून मिळणाऱ्या स्वीकाराचा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यांच्या मूलभूत गरजा आणि हक्कांपासून ते शिक्षण व रोजगाराच्या संधींपर्यंत अनेक पातळ्यांवर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. याच वास्तवाला केंद्रस्थानी ठेवत दिग्दर्शक दिवाकर बाळाराम मोहिते ‘वंचिता’ हा लघुपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत .या लघुपटाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.‘वंचिता’ची कथा, पटकथा आणि संवाद दिवाकर मोहिते यांचे असून, निर्मिती परितोष मोहिते यांनी केली आहे.