

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते त्यांच्या सडेतोड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्या कायमच त्यांची मतं स्पष्टपणे व्यक्त करत असतात. नुकतंच त्यांनी एका मुलाखतीमध्ये आताच्या पिढीच्या विचारांबद्दल आणि देशात स्त्रियांबाबत घडणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत भाष्य केलं.