- नितीन बिनेकर
मुंबई - भारतीय रेल्वेच्या आधुनिकतेचे प्रतीक असलेली वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या या अत्याधुनिक ट्रेनने या वेळी धावण्याऐवजी थांबूनच तब्बल २० लाख रुपयांची कमाई केली. पहिल्यादाच भारतीय रेल्वेच्या व्यावसायिक चित्रिकरणातून ही कमाई केल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.