

vanita kharat
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री वनिता खरात हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आजवर भरपूर हसवलं. मात्र आज तिचं स्वतःचं असं हक्काचं स्वप्न पूर्ण झालंय. वनिताने काही दिवसांपूर्वीच स्वतःचं घर घेतल्याचं सांगितलं होतं. आता तिने त्या घरात गृहप्रवेश केला आहे. वनिताने नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यात तिने तिच्या नव्या घराची झलक दाखवली आहे.