

vanita kharat
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेत्री वनिता खरात हिने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तीची 'कबीर सिंग' मधली भूमिका देखील चांगलीच गाजली. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेल्या कलाकारांपैकी एक म्हणजे वनिता. मात्र तिचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. तिचं बालपण वरळी कोळीवाड्यातल्या एका १० बाय १० च्या घरात गेलं. २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या पुरात तिचं अख्ख घर पडलं होतं. आता नुकत्याच MHJ पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितलंय.