जीम नाही मग वनिता खरातने कसं कमी केलं २९ किलो वजन? वेट लॉस जर्नी सांगत म्हणाली- साधा जिना चढताना दम लागायचा...

Vanita Kharat Weight Loss Journey 29 Kg Transformation Without Gym: मराठमोळी अभिनेत्री वनिता खरात हिने जीम न लावताच तब्बल २९ किलो वजन कमी केलं. तिने केलेला हा बदल पाहून आता सगळेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र तिने हे केलं तरी कसं?
vanita kharat weight loss journey

vanita kharat weight loss journey

esakal

Updated on: 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यात तिच्यात प्रचंड बदल झालाय. तिने ८ महिन्यात तब्बल २९ किलो वजन कमी केलंय. तिने केलेलं हे ट्रान्सफॉर्मेशन पाहून अनेकांनी तोंडात बोटं घातलीयेत. ती अनेकदा तिचे व्यायामाचे व्हिडिओ शेअर करताना दिसते. मात्र तिने हा बदल कोणतीही जीम न लावता केलाय. त्यामुळे चाहत्यांना धक्काच बसलाय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वनिताने तिच्या या प्रवासाबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com