

vanita kharat
esakal
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री वनिता खरात तिच्या विनोदाच्या उत्कृष्ट टायमिंगसाठी ओळखली जाते. या कायक्रमासोबतच ती काही चित्रपटातदेखील दिसलीये. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तिला कोळीवाड्याची रेखाही म्हटलं जातं. नुकताच वनिताने चक्क ताज हॉटेलमध्ये तिचा वाढदिवस साजरा केला. आता वनिताने तिचा मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय जो पाहून अनेकांना हसू आलंय. तर अनेकांनी तिच्या प्रयत्नांचं कौतुक केलंय.