
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक दिग्गज अभिनेते म्हणजे दिवंगत विजय चव्हाण. विनोदी ते गंभीर अशी प्रत्येक भूमिका बखुबीने साकारणारे हे कलाकार चर्चेत आले आहेत ते त्यांच्या मुलाच्या धक्कादायक मुलाखतीमुळे. काही दिवसांपूर्वी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा मुलगा वरदने त्याला इंडस्ट्रीमध्ये आलेले चांगले-वाईट अनुभव तसंच येथील कलाकारांचा दुतोंडीपणा यावर भाष्य केलं.