
varsha usgaonkar on aswini bhave
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी अनेक हिट चित्रपटात काम केलं. त्यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपलं स्थान निर्माण केलं. त्यांची 'तिरंगा' चित्रपटातली नाना पाटेकर यांच्यासोबतची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे त्या मराठी प्रेक्षकांसाठी पहिल्या वंडरगर्ल ठरल्या. मात्र त्यांच्यात आणि अभिनेत्री अश्विनी भावे यांच्यात ३६ चा आकडा होता. याबद्दल स्वतः वर्षा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय.