

varsha usgaonkar on aamir khan brother
esakal
मराठमोळ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या नावाचा ठसा उमटवला. ‘दूध का कर्ज’, ‘साथी’, ‘शिकारी’, ‘हफ्ता बंद’, ‘हनीमून’, ‘तिरंगा’ यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्या मुख्य अभिनेत्री म्हणून झळकल्या. सध्या वर्षा सिनेमांमध्ये दिसत नसल्या तरी त्या छोट्या पडद्यावर मात्र काम करत आहेत. आता वर्षा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. वर्षा यांनी नुकत्याच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचा आमिर खानचा भाऊ फैझल खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितलाय.