

varsha usgaonkar on madhuri dixit song choli ke pichhe kya hai
esakal
आपल्या अभिनयाने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मिथुन चक्रवर्ती, जितेंद्र, अक्षय कुमार, ऋषी कपूर यांच्यासोबत काम केलंय. मात्र त्यांच्या काही चुकांमुळे त्यांचं हिंदीतलं करिअर व्यवस्थित होऊ शकलं नाही असं त्या म्हणाल्या. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या एका गाण्यावर सेन्सॉर बोर्डाने कशी कात्री चालवली ते सांगितलं. मात्र तेच बोल जेव्हा माधुरी दीक्षितच्या गाण्याचे होते तेव्हा मात्र ते गाणं तसंच ठेवण्यात आलं असं त्या म्हणाल्यात. हे गाणं होतं 'चोली के पीछे क्या है'.