
VARSHA USGAONKAR
ESAKAL
आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी मराठीसोबतच हिंदी सिनेमांमध्येही आपली छाप पाडली. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय. अनेक उत्तम चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये काम केलंय. त्या 'बिग बॉस माराठी ' मध्येही सहभागी झाल्या होत्या. त्यासोबतच त्या 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत माईंच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यांनी बॉलिवूडमधीलही अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी अनिल कपूर यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितलाय.