

varsha usgaonkar on lakshmikant berde and ashok saraf
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण मराठी इंडस्ट्री गाजवली. त्यांच्या सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदीमध्येही अनेक चित्रपट केले. ऋषी कपूर ते नाना पाटेकर अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केलं. मराठीत तर त्या वंडर गर्ल होत्या. त्यांनी मराठीत अनेक चित्रपट केले. त्यातले काही सुपरहिट ठरले. आता आपल्या या चित्रपटांचं श्रेयं त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिलंय. लक्ष्मीकांत यांच्यामुळे आपण इतके चित्रपट केले असं त्या म्हणाल्यात. सोबतच अशोक सराफ लक्ष्मीकांत यांना वाणी का म्हणायचे याबद्दलही त्यांनी सांगितलंय.