WHO IS VARSHA USGAONKAR HUSBAND
Esakal
VARSHA USGAONKAR REVEALS DETAILS ABOUT HER HUSBAND: वर्षा उसगांवकर यांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेषतः ९० च्या दशकात त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आजही त्या विविध कारणांमुळे चर्चेत असतात. दरम्यान, नुकतीच त्यांनी 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या करिअरसोबतच वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या. यावेळी त्यांनी पती आणि त्यांच्यातील नात्याबद्दलही काही खास किस्से शेअर केले.