
Bollywood Entertainment News : अभिनेता वरुण धवनचा बहुप्रतीक्षित बेबी जॉन या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. थलपती विजयच्या थेरी सिनेमावर आधारित असलेल्या या सिनेमाची चर्चा गेल्या बराच काळापासून आहे. या सिनेमाच्या टीझरनेही प्रेक्षकांची मनं जिंकली होती आणि आता या सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.