अभिनेता वरुण धवनचा मोठा चाहतावर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय. वरुण धवन नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान अनुराग सिंग दिग्दर्शित बॉर्डर सिनेमा 1997 रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमा प्रचंड गाजला. सनी देओलने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. दरम्यान आता लवकरच या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिकेमध्ये असणार आहे.