

JIYAA SHANKAR
ESAKAL
मराठी इंडस्ट्री असो किंवा हिंदी इंडस्ट्री, असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी प्रेक्षकांना आपल्या अभिनयाने भुरळ घातली. त्यांच्यावर प्रेक्षक फिदा आहेत. मात्र इंडस्ट्रीमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांना अनेक वर्ष झाली काम मिळत नाहीये. उत्तम काम करत असूनही त्यांच्याकडे ऑफर नाहीयेत. अशाच एका अभिनेत्रीने आता काम मिळत नसल्याने खंत व्यक्त केलीये. मालिका, वेब सीरीज आणि चित्रपट केल्यानंतरही गेली २ वर्ष तिला काम मिळत नाहीये. महत्वाचं म्हणजे ती रितेश देशमुख याच्या 'वेड' सिनेमात झळकलीये. अभिनयात तिने थेट जिनिलियाला टक्का दिलीये. मात्र असं असूनही तिला काम नसल्याने घरी बसून राहावं लागलंय.