VEEN DOGHANTLI HI TUTENA TWIST
esakal
Veen Doghantli Hi Tutena Twist: Samar’s Past Revealed : वीण दोघातली ही तुटेना ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या नवेनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. मालिकेतील समर स्वानंदीचे गोड भांडणं प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तर दुसरीकडे राजवाडेंच्या घरात स्वानंदीवर कुटुंबियांकडून अविश्वास दाखवला जातोय. मल्लिका आणि अंशुमन हे कटकारस्थान करत जान्हवीच्या मागे हाथ धुवून लागलेत. स्वानंदीला हळुहळु घरातल्या व्यक्तींचा खोटारडेपणा कळत आहे. तर अंशुमननं त्याचं खरं रुप जान्हवीसमोर आणलं आहे.