Veteran Actor Asrani Passes Away at 84
esakal
ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज दुपारी ३ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केलं. शोले चित्रपटात त्यांनी केलेली जेलरची भूमिका चांगलीच गाजली होती. तीन पिढ्यांना हसवणारा अभिनेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.