
sachin pilgaonkar
ESAKAL
लहानपणापासून सिनेसृष्टीमधे सक्रीय असलेले लोकप्रिय मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला सोनेरी दिवस दाखवले. त्यांनी 'बनवाबनवी', 'नवरी मिळे नवऱ्याला', 'आयत्या घरात घरोबा', 'माझा पती करोडपती', 'नवरा माझा नवसाचा' अशा अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आणि या चित्रपटांमध्ये कामही केलं. गेल्या काही वर्षात त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आणि ओटीटीवर त्यांचा दबदबा निर्माण केला. त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. मात्र गेल्या काही महिन्यांपासून महागुरू सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतायत. त्यांनी मराठी आणि उर्दू भाषेवर केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे.