

nirmiti sawant
esakal
मराठी नाटक, चित्रपट आणि मालिका या तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या निर्मिती सावंत यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडलीये. त्या पडद्यावर जितक्या गोड दिसतात तितक्याच वैयक्तिक आयुष्यातही आहेत. त्या त्यांच्या विनोदाच्या टायमिंगसाठी ओळखल्या जातात. भल्या भल्या विनोदवीरांना पाणी पाजणाऱ्या निर्मिती यांची घरात पदोन्नती झाली आहे. निर्मिती सावंत आजी झाल्या आहेत. एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितलं आहे.