
News : ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना संध्या म्हणजेच विजया देशमुख यांचं काल 3 ऑक्टोबरला रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं. मृत्यूसमयी त्या 94 वर्षांच्या होत्या. आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.