
Bollywood Entertainment News : बॉलिवूडचे ही मॅन धर्मेंद्र यांच्या दमदार सिनेमांप्रमाणेच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही तितकंच चर्चेत राहिलं. एक काळ तर असा होता की प्रत्येक अभिनेत्री त्यांची चाहती होती आणि अनेक जणींशी त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. पण धर्मेंद्र यांच्या आयुष्यातील पहिलं प्रेम असलेली तरुणी कुणीतरी वेगळीच होती. ती नाही सिनेविश्वाशी संबंधित होती नाही त्यांच्या नात्यातील. कोण होती ती ? कशी सुरु झाली त्यांची लव्हस्टोरी जाणून घेऊया.