
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकार होऊन गेले ज्यांनी त्यांच्या टॅलेंटमुळे खूप नाव कमावलं. पण नंतर दुर्दैवाने त्यांच्यावर वाईट वेळ आल्यावर त्यांना कुणी विचारलंही नाही. ते बॉलिवूडपासून दुरावले आणि लोकांनाही कालांतराने त्यांचा विसर पडला. काहींचे तर इतके हाल झाले की अक्षरशः रस्त्यावर झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली तर काहींना दोन वेळेचं जेवणही मिळणं मुश्किल झालं. इंडस्ट्रीला लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांसारखे दिग्गज गायक देणाऱ्या संगीतकाराचीही अखेरच्या काळात खूप वाईट अवस्था झाली/