'मला नागराज मंजुळेसोबत सिनेमा करायचा' विकी कौशलचं वक्तव्य, म्हणाला...'मराठी चित्रपट मला खुप...'

VICKY KAUSHAL EXPRESSES DESIRE TO WORK WITH NAGRAJ MANJULE:बॉलिवूड अभिनेता विकी कौशलने मराठी सिनेमांबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करत नागराज मंजुळे आणि अविनाश अरुण यांच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
vicky kaushal on nagraj manjule

vicky kaushal on nagraj manjule

ESAKAL

Updated on

VICKY KAUSHAL CALLS MAHARASHTRA HIS KARMABHOOMI: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलय. त्यांच्या प्रत्येक भूमिका लक्षवेधी होत्या. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' या सिनेमात विकी कौशलच्या भूमिकेचं खुप कौतूक झालं. या सिनेमात विकीनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. दरम्यान यासाठी विकीला 'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर-अभिनेता' म्हणून पुरस्कार मिळालाय. दरम्यान याच सोहळ्यात त्याने मराठी सिनेमात काम करायची इच्छा व्यक्त केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com