Vicky Kaushal : छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसावं म्हणून विक्कीने वाढवलं 25 किलो वजन, सात महिने शिकला घोडेस्वारी
Chhaava Movie: 'छावा' चित्रपटात विक्की कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावली होती. यासाठी विक्कीने तब्बल 25 किलो वजन वाढवलं होतं. यासाठी त्याला सात महिने प्रशिक्षण देण्यात आलं.
विक्की कौशलचा 'छावा' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात विक्की कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. विक्कीने या चित्रपटात दमदार निभावली आहे.