
१६ जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळा दिनी 'छावा' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून मोठी घोषणा करण्यात आली. १६ जानेवारी १६८१ रोजी स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज सिंहासनावर बसले. याच दिवसाचं औचित्य साधून अभिनेता विकी कौशल याच्या 'छावा' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. या पोस्टरमध्ये या चित्रपटाची रिलीज डेटदेखील जाहीर करण्यात आलीये. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.