
KATRINA KAIF PREGANANCY
ESAKAL
बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडीपैकी एक असणारी जोडी म्हणजे विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची. त्यांच्या चित्रपटांइतकच त्यांचं वैयक्तिक आयुष्यही चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. काही दिवसांपूर्वीच कतरिना आणि विकी यांनी ते दोघे आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली. जे ऐकून त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कलाकारच नाही तर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. चाहत्यांसोबतच कौशल कुटुंबीय देखील त्यांच्या घरी येणाऱ्या चिमुकल्या पाहुण्याचं स्वागत करायला सज्ज झाले आहेत. त्यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. अशातच आता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल याने कतरिनाच्या गरोदरपणावर भाष्य केलंय.