

लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या 'छावा' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १४ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाला अवघे ३ दिवस बाकी असताना सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा आहे. अशातच सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलादेखील प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद लाभला आहे. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींची कमाई केलीये. केवळ ४८ तासात 'छावा'च्या २ लाख तिकिटांची विक्री झाली आहे.