
PRIYA BAPAT NEW KISSING SCENE: छोटा पडदा, मोठा पडदा असो किंवा रंगभूमी, आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. प्रियाने अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलंय. मात्र गेल्या काही वर्षांपासून तिने आपला मोर्चा हिंदी सिनेमा आणि वेबसीरिज कडे वळवला आहे. ती अनेक हिंदी सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसतेय. नुक्त्या मुख्य भूमिकाच नाही तर त्या भूमिका प्रचंड लोकप्रिय देखील ठरताना दिसतात. आता नुकतीच प्रियाची 'अंधेरा' ही वेब सीरिज प्रदर्शित झालीये. यात प्रिया पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करतेय. मात्र या सिरीजमध्ये देखील तिने असा एक सीन दिलाय ज्याची प्रचंड चर्चा रंगलीय.