बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी खूप कष्ट केलय. आज ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दरम्यान विद्या बालन याआधी मालिकेत दिसली होती. 'हम पाच' या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर तिने मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. परंतु अनेक चित्रपटांमध्ये तिला नाकारण्यात आलं.