
suchitra bandekar
esakal
अभिनेत्री सुचित्रा बांदेकर चित्रपट आणि मालिकांमध्ये फारशा सक्रीय नसल्या तरी त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक काळ गाजवलाय. 'झिम्मा' चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सुचित्रा यांनी 'हम पांच', 'अवंतिका', 'वहिनीसाहेब' यांसारख्या मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. या त्यांच्या मालिका चांगल्याच गाजल्या. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर त्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात दिसल्या. सध्या त्या 'मनपसंद की की शादी' या मालिकेत दिसतायत. मात्र नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी एक किस्सा सांगितला आहे जेव्हा विद्या बालनसाठी सुचित्रा यांना जाहिरातीमधून वगळण्यात आलं होतं.