
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'घरोघरी मातीच्या चुली' सध्या प्रेक्षकांच्या रोषाला सामोरी जातेय. या मालिकेत अगदी काहीही दाखवलं जातंय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. सध्या या मालिकेत सुरू असलेल्या ट्रॅकवरही नेटकरी वैतागले आहेत. मालिकेत आता सुमित्रा आई जानकीच्या कानाखाली वाजवणार आहेत. जे पाहून प्रेक्षक मालिकेच्या कथेवर वैतागले आहेत. जानकीच्या चांगुलपणाची ही फळं आहेत असं म्हणत आहेत.