

Vijay Deverakonda Announces Scholarships for 9th and 10th Students from Telangana after wedding with Rashmika Mandanna
sakal
Vijay Deverakonda foundation scholarship details: सध्या चित्रपटसृष्टीमध्ये एकच चर्चा सुरु आहे आणि ती म्हणजे दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाची. २६ फेब्रुवारीला आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत पारंपारिक पद्धतीने लग्न उरकल्यानंतर भारतातील अनेक राज्यांध्ये मिठाई वाटून त्यांनी आनंद साजरा केला.
याचे बरेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. त्यातच आता विजय देवरकोंडाने अजून एक खुशखबर दिली आहे. त्याने तेलंगणातील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप जाहीर केली आहे.