

VIJAYA BABAR
ESAKAL
लोकप्रिय मराठी अभिनेत्री विजया बाबर हिने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलंय. ती 'कमळी' बनून घराघरात लोकप्रिय झालीये. झी मराठीवरील 'कमळी' या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसतेय. या मालिकेचा टीआरपी यादीवरही दबदबा आहे. 'कमळी' ही मालिका टीआरपी यादीत झी मराठीवरील इतर मालिकांना मागे टाकून सतत पहिल्या नंबरवर राज्य करतेय. अगदी गावखेड्यातही कमळी प्रचंड लोकप्रिय आहे. आता प्रेक्षकांच्या आवडत्या कमळीने तिला कसा नवरा हवाय याबद्दल तिच्या अपेक्षा सांगितल्या आहेत.