
'द साबरमती रिपोर्ट', '१२ थ फेल' यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता विक्रांत मेस्सी याने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा हा निर्णय ऐकून चाहतेही दुःखी आहेत. मात्र अभिनेत्याने त्याच्या निर्णयात आता काहीही बदल होणार नसल्याचं सांगितलंय. त्याने एक पोस्ट करत चाहत्यांना याबद्दल माहिती दिलीये. त्याने याचं कारण मात्र उघड केलेलं नाही. मात्र आपल्या मुलाच्या काळजीने त्याने हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जातंय. त्याचा एक व्हिडिओ समोर येतोय ज्यात तो आपल्या मुलाच्या सुरक्षेबद्दल बोलताना दिसतोय.