
आषाढी एकादशी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या दिवसासाठी महिनाभर आधीपासून आपल्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना होतात. कित्येक किलोमीटर पायी चालत वारी करतात. असंख्य वारकरी आणि त्यांची विठ्ठलाप्रतीची श्रद्धा याला तोड नसते. आपल्या पांडुरंगाचं नाव घेत हे वारकरी पंढरपुरापर्यंत येऊन पोहोचतात. दिवे घाटातला पालखीचा क्षण तर अविस्मरणीय असतो. अनेक मराठी कलाकारही दरवर्षी वारीत सहभागी होतात. अशीच एक कलाकार आता वारीत अनेक वारकऱ्यांची सेवा करताना दिसतेय.