
अभिनेत्री तेजश्री प्रधान मराठी अभिनय क्षेत्रातील चमकता तारा आहे
पण अनेकांना तिचे लग्न सोडून वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त माहिती नाही
तेजश्रीला एक बहीण आहे आणि प्रधान कुटुंबात आता त्या दोघीच आहेत
Tejashri Pradhan Sister : मराठी मालिकाविश्वातील चमकता तारा म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधान. तिच्या प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’मधील जान्हवी असो वा ‘अग्गंबाई सासूबाई’मधील शुभ्रा, तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांचं मन जिंकलं. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेतून पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या यशस्वी अभिनेत्रीची बहीण कोण आहे आणि ती काय करते? चला, जाणून घेऊया