
Viral Video: मुंबईचा वडापाव म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. स्वस्तात मस्त, वेळेला पोट भरणारा हा मुंबईचा वडापाव कायमच अनेकांचा आवडता ठरलाय. सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारं स्ट्रीटफूड म्हणजे वडापाव जो उन्हाळा, पावसाळा, उन्हाळा कधीही खाल्ला जाऊ शकतो. सर्वसामान्यांसोबतच अनेक कलाकारांनादेखील वडापाव आवडतो. कित्येक कलाकार आपलं डाएट चीट करत वडापाव खाताना दिसतात. असाच आता आमिर खान यालाही वडापावची भुरळ पडलीये. तो चक्क दादर स्टेशन बाहेर वडापाव बनवताना दिसतोय.